ललित गांधीसह १३ जणांवर जमावबंदी आदेश भंगचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST2021-07-21T04:17:58+5:302021-07-21T04:17:58+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल राजारामपुरी पोलीस ठाण्यात राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह १३ ...

ललित गांधीसह १३ जणांवर जमावबंदी आदेश भंगचा गुन्हा
कोल्हापूर : कोरोना संसर्गात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल राजारामपुरी पोलीस ठाण्यात राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह १३ जणांवर गुन्हे नोंदविले. शासनाने व्यापार सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर गांधी यांच्यासह राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी सोमवारी आनंदाप्रीत्यर्थ मिरवणूक काढली. याबाबत ‘प्रजासत्ताक’च्या दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
जिल्ह्यात व्यापार सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. या आनंदाप्रीत्यर्थ राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी सोमवारी बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढली. बंदी आदेशाचा भंग करून मिरवणुकीत जनावरांचा वापर केल्याबद्दल राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी आणि इतरांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत गांधी यांच्यासह अनिल पिंजाणी, शाम बसरानी, दीपक पुरोहित, अभिजित गुजर, प्रताप पोवार, प्रशांत पोकळे, रहिम सनदी, दर्शन गांधी, गजानन पवार, महेश जेवराणी, सतीश माने, भरत रावळ यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात बंदी आदेशाचा भंग आणि मूक जनावरांचा वापर केल्याबद्दल गुन्हा नोंद केला.