१२७ खेळाडूंचा सहभाग : निपाणीच्या उत्कर्ष फौंडेशनतर्फे आयोजन
By Admin | Updated: November 25, 2014 00:44 IST2014-11-25T00:42:10+5:302014-11-25T00:44:08+5:30
स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना राष्ट्रीय नामांकन मिळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रेल्वेच्या हिमांशू शर्माने पहिले नामांकन मिळविले.

१२७ खेळाडूंचा सहभाग : निपाणीच्या उत्कर्ष फौंडेशनतर्फे आयोजन
निपाणी : निपाणीतील उत्कर्ष फौंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन मान्यताप्राप्त रतनबाई शाह राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला आज, सोमवारी प्रारंभ झाला. उद्योजक पोपटलाल शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तर धनंजय मानवी, शंतनू मानवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उत्कर्ष फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीणभाई शाह यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले, या स्पर्धेमुळे निपाणीचा नावलौकिक वाढेल. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना राष्ट्रीय नामांकन मिळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रेल्वेच्या हिमांशू शर्माने पहिले नामांकन मिळविले. पहिल्या फेरीत राहुल संगमा (रेल्वे), प्रज्ज्वल जोशी (कर्नाटक), अनिरुद्ध देशपांडे (महाराष्ट्र), ए. एल. मुथाई (तमिळनाडू), जे. रामकृष्ण (आंध्र प्रदेश), धुळिप्पा बाला, चंद्राप्रसाद (आंध्र प्रदेश), हेमंतकुमार मांद्रे (महाराष्ट्र), कांतिलाल दावे (राजस्थान), शंतनू मिराशी (महाराष्ट्र), भूषण लक्ष्मीकृष्ण (आंध्र प्रदेश), सुमित ग्रोव्हर (काश्मीर), रिया सावंत (गोवा), रवींद्र निकम (महाराष्ट्र), ए. विश्वेश्वर (तमिळनाडू), प्रशांत अनवेकर (कर्नाटक), शाने अलविरन (गोवा), एस. व्ही. चक्रवर्ती (तेलंगणा), ओंकार काजवे (महाराष्ट्र), वरद बेडेकर (कर्नाटक), रोहन जोशी (महाराष्ट्र), अनंत प्रभूदेसाई (गोवा), एल. बी. खाडीलकर, शुभम कुमठेकर (महाराष्ट्र), विष्णू नाईक (गोवा) यांनी यश मिळविले.
उद्घाटन समारंभास ‘हाल’शुगरचे चेअरमन बाबासाहेब सासने, भारत पाटोळे, साहियाज मिरजे, डॉ. महेश कोरे, बाबासो मगदूम, दयानंद साजनावर, डॉ. अरुण पाटील, अरविंद बेडेकर उपस्थित होते. (वार्ताहर)