शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

पी.एम.किसान फसवणुकीमुळे १२५० तरुणांचे करिअर धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:11 IST

PM Kisan Scheme , Framar, kolhapurnews नावावर जमीन नसताना शासनाची फसवणूक करून पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा (पी. एम. किसान) लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील १२५० तरुणांचे करिअर धोक्यात येणार आहे. त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली शासनाच्या पातळीवर सुरू आहेत. आजोबाच्या नावावर जमीन आणि नातवाने लाभ घेतल्याचे चौकशीत उघड झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.

ठळक मुद्देपी.एम.किसान फसवणुकीमुळे १२५० तरुणांचे करिअर धोक्यातजिल्हा प्रशासनाच्या पातळीवर हालचाली : नावावर जमीन नसताना घेतला लाभ

राजाराम लोंढेकोल्हापूर : नावावर जमीन नसताना शासनाची फसवणूक करून पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा (पी. एम. किसान) लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील १२५० तरुणांचे करिअर धोक्यात येणार आहे. त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली शासनाच्या पातळीवर सुरू आहेत. आजोबाच्या नावावर जमीन आणि नातवाने लाभ घेतल्याचे चौकशीत उघड झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.सातत्याने नैसर्गिक संकटाने अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजना सुरू केली. शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार २१ लाभार्थी आहेत. मात्र, बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्याची चौकशी गेली महिनाभर जिल्ह्यात सुरू होती. यामध्ये १३ हजार ४३७ खातेदारांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.यामध्ये ९५०० लाभार्थ्यांच्या नावावर जमीनच नाही तर एकाच कुटुंबातील पती-पत्नी यांनी लाभ घेतलेले १५६६ जण असून २३७१ नोकरदार व आयकर परतावा करणारे आहेत. विशेष म्हणजे ९५०० जमीन नसलेल्या लाभार्थ्यापैकी १२५० हे तरूण आहेत. जे करिअरच्या उंबरठ्यावर आहेत. ही फसवणूक त्यांच्या चांगलीच अंगलट येणार असून त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. या तरुणांनी आताच शासनाची फसवणूक केली असेल तर भविष्यात सेवेत जाऊन वेगळे काय करणार? अशी धारणा शासकीय यंत्रणेची झाली आहे. त्यामुळे त्यांचे करिअर धोक्यात आले आहे.पैसे भरले नाहीतर रेशन बंदशासनाची फसवणूक करून पेन्शनचा लाभ घेतलेल्या खातेदारांकडून १५ टक्के व्याजदराने लाभ घेतलेली रक्कम वसूल होणार आहे. जी ही रक्कम भरणार नाहीत, त्यांचे रेशन बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.यांना लाभ मिळणार नाही -

  • शेतकरी आहे, पण सरकारी कर्मचारी आहे.
  • सरकारी सेवेतून सेवानिवृत्त
  • मासिक पेन्शन दहा हजार मिळते.

लोकमतमध्येच सर्वप्रथम वृत्तपी. एम. किसान योजनेत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिले होते. हे वृत्त तंतोतंत ठरले आहे.फसवणूक केलेले लाभार्थी -

  • जमीन नसलेले - ९५०० पैकी १२५० तरुण
  • पती-पत्नी दोघे लाभार्थी - १५६६
  • नोकरदार, आयकर भरणारे - २३७१
टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी