जिल्ह्यात कोरोनाचे १२ नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:03+5:302020-12-05T04:56:03+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत १२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेतील ६० वर्षीय ...

जिल्ह्यात कोरोनाचे १२ नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत १२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेतील ६० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासांत १२ नवीन रुग्ण आढळले असले तरी ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील सात, करवीर तालुक्यातील दोन, नगरपालिका हद्दीत दोन, तर गगनबावडा तालुक्यात एक रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्ण संख्या ४९ हजार ११० इतकी झाली असून, ४७ हजार ११६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १६८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.