कोल्हापुरात ११ जणांना अटक
By Admin | Updated: July 27, 2014 00:56 IST2014-07-27T00:56:18+5:302014-07-27T00:56:18+5:30
साळोखे पार्क झोपडपट्टी परिसरात कारवाई

कोल्हापुरात ११ जणांना अटक
कोल्हापूर : साळोखे पार्क झोपडपट्टी परिसरात पत्याचा जुगार खेळणाऱ्या ११जणांना काल, शुक्रवारी रात्री राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून रोख ३५ हजार ५७५, दहा मोबाईल, असा सुमारे ४७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित अजय सुरेश मछले (वय ३०), अतिश सुरेश मछले (४०, दोघेही रा. साळोखे पार्क), महादेव शामराव भास्कर (५३, जवाहरनगर), सचिन दिलीप माटुंगे (३४, मोरेवाडी, ता. करवीर) शिवाजी साताप्पा पाटील (३४, सुभाषनगर), बॉबी दिलीप परेरा (४४, जवाहरनगर), नेमाण्णा रामाण्णा हदेमणी (५०), शिवराज बापू गायकवाड (३१, दोघे राहणार राजेंद्रनगर), सुनील गजानन शिंदे (२५, जवाहरनगर) रामचंद्र उर्फ बाळू वसंत सणगर (६०, कागल), मोहन गोविंद वरवंटे (२०, साळोखे पार्क) यांना अटक केली.
आज, शुक्रवारी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता या सर्वांची जामिनावर मुक्तता झाली. याची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)