१७ पैकी ११ दिवस मृत्युसंख्या ५० च्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:08+5:302021-05-19T04:24:08+5:30
कोल्हापूर मे महिन्यातील गेल्या १७ पैकी ११ दिवशी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ...

१७ पैकी ११ दिवस मृत्युसंख्या ५० च्या वर
कोल्हापूर मे महिन्यातील गेल्या १७ पैकी ११ दिवशी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या रोज ५०हून अधिक नोंदविण्यात आली आहे. यावरूनच कोल्हापूरच्या मृत्युदराची कल्पना येते.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा देशपातळीपेक्षा अधिक असून याची दखल घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोल्हापूरला टास्क फोर्सचे सदस्य पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी गेल्या आठवड्यामध्ये तीन सदस्यीय टास्क फोर्सची कोल्हापूरमधील सीपीआर आणि इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती.
मे महिन्यातील कोरोना मृत्यूच्या आकड्यांवर नजर टाकल्यास हे आकडे भीतीदायक आहेत. १७ पैकी तब्बल ११ दिवस ५० हून अधिक मृत्यू झाले असून रुग्णांवर उपचारासाठी मिळणारा कमी कालावधी हे प्रमुख कारण सांगितले जाते तसेच खासगी रुग्णालयांतून अतिगंभीर रुग्ण सीपीआर, आयजीएममध्ये पाठविले जातात. त्यामुळेही या दोन्ही रुग्णालयांमधील मृत्यू हे तब्बल ४५ टक्के आहेत.
चौकट
दिनांक झालेले मृत्यू
१ मे ३७
२ ३४
३ ३५
४ ४४
५ ५३
६ ५४
७ ६०
८ ४६
९ ५०
१० ६१
११ ५१
१२ ५८
१३ ५३
१४ ४७
१५ ६२
१६ ५२
१७ ५०
एकूण मृत्यू ८५७
कोट
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सर्वांत जास्त आहे ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूपैकी ४५ टक्के मृत्यू हे सीपीआर आणि आयजीएम इचलकरंजी या शासकीय रुग्णालयांमध्ये होत आहे. याबरोबरच आणखी तीन रुग्णालयांमध्ये या खालोखाल प्रमाण आहे. या पाच रुग्णालयांच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
डॉ. सुभाष साळुंखे
प्रमुख विभागीय टास्क फोर्स