राजारामपुरी पोलीस हद्दीतील ११ गुन्हेगार पाच दिवसांसाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:03+5:302021-09-16T04:32:03+5:30
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वृत्तीच्या ११ जणांना पाच ...

राजारामपुरी पोलीस हद्दीतील ११ गुन्हेगार पाच दिवसांसाठी हद्दपार
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वृत्तीच्या ११ जणांना पाच दिवसांसाठी दि. २० सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर शहर व करवीर तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
कारवाई झालेल्यांची नावे : विशाल विजय जाधव (वय ३७, रा. राजारामपुरी ११ वी गल्ली), रोहित बाबासाहेब पोवार (३६ रा. माऊली पुतळा, राजारामपुरी), रहिम शौकत सनदी (३३, रा. राजारामपुरी ३ री गल्ली), प्रदीप शिवाजी गायकवाड (३६, रा. वर्षानगर), साहिल चाँदसाहेब गवंडी (२६, रा. नुराणी मशीद, विक्रमनगर), सूरज राजू शिंदे (२७, रा. जोशी गल्ली, विक्रमनगर), राहुल हिंदुराव कांबळे (३७, रा. ख्रिश्चन वसाहत, विक्रमनगर), सूरज संभाजी साठे (२९, रा. जोशी गल्ली, विक्रमनगर), आशिष अनिल पोवार (२९, रा. सम्राट कॉलनी, विक्रमनगर), आकाश शमुवेल वाघमारे (२४, रा. ख्रिश्चन वसाहत, विक्रमनगर), महेश धर्मराज कांबळे (२७, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी).
या ११ जणांना गणेशोत्सव कालावधीसाठी हद्दपार करण्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यामार्फतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या ११ जणांना दि. १५ ते २० सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातून हद्दपार करण्यास मंजुरी दिली.