शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

कोल्हापुरातील कळंबा तलावावर १०५ प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर

By संदीप आडनाईक | Updated: January 10, 2025 15:44 IST

बर्डस ऑफ कोल्हापूरचा सहावा हंगाम : १९ स्थलांतरित प्रजाती, ८६ रहिवासी प्रजातींची नोंद

कोल्हापूर : बर्डस ऑफ कोल्हापूर आयोजित कोल्हापूर पक्षी गणनेच्या सहाव्या हंगामातील पक्षी गणना कळंबा तलावावर झाली. या गणनेत १०५ प्रजातींच्या ११६१ पक्ष्यांचा वावर असल्याची नोंद झाली. यात १९ स्थलांतरित प्रजाती, ८६ रहिवासी प्रजातींची नोंद केली आहे.

बर्डस ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई, पृथ्वीराज सरनोबत, सतपाल गंगलमाले, मंदार रुकडीकर, ऋतुजा पाटील, प्रणव दातार यांनी ही गणना केली. यात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ पक्षीमित्रांनी सहभाग घेतला होता. रविवार दि. १२ जानेवारी रोजी पुढील पक्षी गणना राजाराम तलावावर होणार आहे.स्थलांतरित पक्षी : कॉमन ग्रीनशँक (हिरव्या पायाचा तुतवार), ग्रीन सँडपायपर (हिरवी तुतारी), वूड सँडपायपर (ठिपकेवाली तुतारी), कॉमन सँडपायपर (सामान्य तुतारी), टेमींक्स स्टिंट (टेमींकचा टीलवा), ब्राउन श्राइक (तपकीरी खाटीक), एशी ड्रोंगो (राखाडी कोतवाल), रोजी स्टारलिंग (पळस मैना), रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर (लाल छातीचा माशीमार), वर्डीटर फ्लायकॅचर (निलांग), क्लेमरस रीड वॉब्लर (बडबड्या बोरु वटवट्या), ब्लिथस रीड वॉब्लर (ब्लिथचा बोरू वटवट्या), साईक्स वॉब्लर (साईक्सचा वटवट्या), बुटेड वॉब्लर (पायमोज वटवट्या),लेसर व्हाईटथ्रोट (छोटा शुभ्रकंठी), कॉमन चीफचॅफ (सामान्य चिपचीप), ट्री पीपीट (वृक्ष तिरचिमणी), वेस्टर्न यल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी)आययूसीएन संकटग्रस्त यादीतील प्रजाती : इंडियन रिव्हर टर्न (नदी सुरय), वुली नेक स्टोर्क (पांढऱ्या मानेचा करकोचा), पैंटेड स्टोर्क (चित्रबलाक)

पुरेसे अन्न, अधिवास नसल्यामुळे स्थलांतरित बदकांनी कळंबा तलावाकडे अजूनही पाठ फिरवली आहे. २०१५ मध्ये कोरडा पडल्यानंतर कळंबा तलावाची जलसृष्टी अजूनही सुधारलेली नाही. भौतिक विकासाबरोबर तलावाला नैसर्गिक विकासाची पण गरज भासत आहे. -प्रणव देसाई, बर्डस ऑफ कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरणforestजंगल