शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

Kolhapur: फुटबॉल खेळताय की किक बॉक्सिंग; यंदा हंगामात १०५ रेड कार्ड, ३५० यलो

By सचिन यादव | Updated: June 10, 2025 18:10 IST

खेळाडू, समर्थकांच्या बेशिस्तपणाने केएसए, संयोजक हतबल

सचिन यादवकोल्हापूर : श्री छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉलचा हंगाम यंदा संपला. यामध्ये खेळाडूंनी बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी तब्बल १०५ रेड कार्ड आणि ३५० यलो कार्ड दाखविले. काही सामन्यांत खेळाडूंनी बेशिस्त वर्तन केल्याचे समोर आले. सामन्यात अनेकदा हाताबाहेर परिस्थिती गेल्याने संघ व्यवस्थापक आणि सामना संयोजक हतबल झाले. हंगामात डिसेंबरपासून सुरू झालेल्या या हंगामात ६० लिग सामने झाले.कोल्हापूर आणि फुटबॉलचे वेगळे समीकरण आहे. फुटबॉल संघात शहरातील प्रत्येक पेठेतील खेळाडू आहेत. प्रत्येकाचा संघ वेगळा आहे. सामन्याच्या वेळी श्री शाहू स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होते. कोल्हापूरला ‘फुटबॉलची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. यंदाच्या हंगामात चार लाखांहून अधिक प्रेक्षकांनी स्टेडियमवर हजेरी लावली.

संयोजकही हतबलखेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी फुटबॉल चषक भरविला. विजेत्या संघाला दीड लाख रुपये आणि उपविजेत्या संघाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले. काही सामन्यांतील हुल्लडबाजी रोखण्यात संयोजक अपयशी ठरले. अनेकदा खेळाडूंनी आणि समर्थकांनी मैदानावर हुल्लडबाजी केली. मारहाण, चप्पल फेक, बाटली फेक, अर्वाच्य शिवीगाळ, पंचाच्या अंगावर धावून जाणे, यांसारखे प्रकार घडले.

गुन्हा दाखल नाहीसामन्यात मारामारीचे प्रकार घडले. संयोजकांच्या मंडपात जाऊन घुसून समर्थकांना मारहाण झाली. मात्र, याप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्याबाबची तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही, तर काही घटनांत पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केलेला नाही. काही घटनांत पोलिसांनी समर्थकांवर लाठीमार केला.

लिग आणि नॉकआऊट सामनेहंगामात श्री शाहू छत्रपती कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन (केएसए) लिग, सतेज चषक फुटबॉल स्पर्धा, उत्तरेश्वर चषक फुटबॉल, अटल चषक, तोडकर चषक, शारंगधर चषक सामने झाले. सहा लिग आणि नॉक आऊट सामन्यात पंचांनी ही कारवाई केली. पंचानी खेळाडूंवर तातडीने कारवाई केल्याने फुटबॉलप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले. हुल्लडबाजी करणाऱ्या संघावर सामन्यांना बंदी, दंडात्मक कारवाई केली. तिकीट विक्रीतून मिळालेल्या रकमेतून हा दंड वसूल केला.

फुटबॉल सामन्यात खेळाडूंचे गैरवर्तनाचे प्रकार सुरू आहेत. पेठापेठांतील इर्ष्याचा राग अनेकदा खेळाडू मैदानावर काढतात. केएसएने यंदा कठोर कारवाई केली. मात्र, मारामारी, दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. - युवराज साळोखे, फुटबॉलप्रेमी