कसबा वाळवे येथे १०० रुग्ण, बँकासह सर्व व्यवहार १० दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:36+5:302021-07-14T04:28:36+5:30

तुरंबे : राधानगरी तालुक्यात ५५० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. १९ गावांत रुग्णांचे प्रमाण सध्या वाढत आहे. ...

100 patients at Kasba Walve, all transactions including bank closed for 10 days | कसबा वाळवे येथे १०० रुग्ण, बँकासह सर्व व्यवहार १० दिवस बंद

कसबा वाळवे येथे १०० रुग्ण, बँकासह सर्व व्यवहार १० दिवस बंद

तुरंबे : राधानगरी तालुक्यात ५५० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. १९ गावांत रुग्णांचे प्रमाण सध्या वाढत आहे. कन्टेन्मेंट झोनमध्ये येण्या-जाण्यास पूर्ण मज्जाव करण्याची आवश्यकता आहे.

तालुक्‍यातील ४० गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे या आजाराचा संसर्ग संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता कमिटी यांनी कडक अंमलबजावणी करण्याची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागाला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आहे.

तिटवे येथे दोन रुग्ण दगावल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील रुग्णवाढ असणाऱ्या गावांना प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. रुग्णसंख्या कमी होण्यासाठी कडक पाऊल उचलत १४ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. कसबा वाळवे गावात तब्बल १०० रुग्ण आहेत. त्यामुळे या गावातील सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या बँक, किराणा दुकान बंद आहेत. स्थानिक प्रशासनस्तरावर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता घेण्याची सूचना प्रांत यांनी दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मोठी गावे चिडीचूप आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर अखंड तालुक्यात लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे.

पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ४० गावांमधील आढळलेले रुग्ण असे - कसबा वाळवे १००, राशिवडे ४१, धामोड २७, पालकरवाडी २४, राधानगरी २०, कसबा तारळे १८, गुडाळ, सोळांकूर, आवळी बुद्रूक तिटवे, सरवडे प्रत्येकी १४, तारळे खुर्द १३, ठिकपुर्ली १२, घोटवडे, तळगाव, पुंगाव, शिरगाव प्रत्येकी ११, कासारपुतळे तुरंबे प्रत्येकी १०, सोन्याची शिरोली, नऊ कोते, नरतवडे प्रत्येकी ८, आमजाई, व्हरवडे कोदवडे, माजगाव प्रत्येकी ७, चंद्रे, तरसंबळे, मजरे, कासारवाडा, मांगेवाडी, मुसळवाडी, शेळेवाडी प्रत्येकी ६, कुंभारवाडी, चक्रेश्वरवाडी, बनाचीवाडी, बारडवाडी, येळवडे, मोघर्डे प्रत्येकी ५, अर्जुनवाडा १, चांदेकरवाडी ३, कपिलेश्वर ३, मांगोली २, आकनूर १, खिंडीव्हरवडे २, सिरसे १, आणाजे.

कोट

बाजारपेठ असणाऱ्या मोठ्या गावात अधिक संपर्क येत असल्याने रुग्णवाढ

राधानगरी तालुक्यातील राशिवडे, धामोड, कसबा तारळे, कसबा वाळवे, सरवडे, सोळांकूर आदी गावांमध्ये बाजार भरतो. बाजार बीट असणारे गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर छोट्या-मोठ्या गावातील लोकांचा नित्य संपर्कामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.- डॉ. राजेंद्रकुमार शेट्ये, राधानगरी तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: 100 patients at Kasba Walve, all transactions including bank closed for 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.