शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विजयादशमीपूर्वी अंबाबाई विकास आराखड्याचे १०० कोटी येतील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 12:17 IST

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १०० कोटी विजयादशमीपूर्वी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १०० कोटी विजयादशमीपूर्वी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली. कोल्हापूरच्या विमानतळ भूसंपादन मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि आंबेओहळ प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील बदलाबाबत सोमवारी बैठक झाली. मंदिर परिसरातील विकास आराखडाअंतर्गत सरस्वती चित्रपटगृहाजवळील बहुमजली वाहनतळ इमारतीच्या नवीन बदलाबात प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सादरीकरण केले. यासाठी डिएसआर बदलल्यामुळे ७९.९६ कोटी रुपयांचा आराखडा १०० कोटींवर जाईल यावर बैठकीत चर्चा झाली. यावर गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवरात्रात हे पैसे मिळावेत अशी मागणी केल्याचे सांगून मुश्रीफ यांनी या विजयादशमीपर्यंत तो निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.या बैठकीला आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, महावितरणचे अधिकाऱ्यांसह विकास आराखडा समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.विमानतळ भूसंपादनाच्या प्रक्रियेत ज्यांनी जमीन संपादनाला मुदतीत प्रतिसाद दिला नाही, त्यांनी मुदतवाढ मागितली आहे, त्यांना दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली होती, ती नोव्हेंबर अखेर वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला जाणार आहे. आंबेओहळाच्या प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून ३६ हेक्टर जमीन वाटप करण्याची राहिली आहे. या प्रकल्पाचे १०० टक्के पुनर्वसन पूर्ण होण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांत हरीश धार्मिक, गडहिंग्लज प्रांत बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ