बावडा कोविड सेंटरला १० वाफेची मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST2021-05-22T04:22:24+5:302021-05-22T04:22:24+5:30

येथील बावडा पॅव्हेलियन मैदानावर सुरू झालेल्या कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरूच असून सामाजिक कार्यकर्ते विनायक कारंडे ...

10 steam machines to Bavda Kovid Center | बावडा कोविड सेंटरला १० वाफेची मशीन

बावडा कोविड सेंटरला १० वाफेची मशीन

येथील बावडा पॅव्हेलियन मैदानावर सुरू झालेल्या कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरूच असून सामाजिक कार्यकर्ते विनायक कारंडे यांनी १० वाफेचे मशीन प्रदान केले.

या कोविड सेंटरमध्ये ६० रुग्णानची सोय केली आहे. रात्रंदिवस या केंद्रात कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. त्यासाठी कसबा बावडा परिसरातील डॉक्टर अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या कोविड सेंटरला दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत या परिसरातील अनेकांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदत केंद्राकडे सुपूर्द केली आहे. विनायक कारंडे यांनी आपली मदत गजानन बेडेकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी इंद्रजित कारंडे, संतोष कारंडे, सनी कारंडे, सचिन कदम, भास्कर भोसले, नोडल ऑफिसर मनाली मिठारी, डॉ. माधुरी कुंभार, प्रज्ञा कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: 10 steam machines to Bavda Kovid Center