शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान नगरपरिषदेचे शिवसेनेचे १० नगरसेवक भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 15:22 IST

Bjp ChandrkantPatil : रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगराध्यक्ष जरी शिवसेनेचा असला तरी त्यांनी बहुमत गमावले आहे. यावेळी माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकुर उपस्थित होते.

ठळक मुद्देमाथेरान नगरपरिषदेचे शिवसेनेचे १० नगरसेवक भाजपमध्येप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश

कोल्हापूर  : रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगराध्यक्ष जरी शिवसेनेचा असला तरी त्यांनी बहुमत गमावले आहे. यावेळी माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकुर उपस्थित होते.या नगरपरिषदेमध्ये १७ पैकी १४ नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. त्यातील दहा सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी यांचे पाटील यांनी भाजपचा स्कार्फ घालून, गुलाबपुष्प देवून स्वागत केले. या सर्वांचा भाजपमध्ये सन्मान केला जाईल असे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, माजी मंत्री, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नियोजनाप्रमाणे कोकणात भाजपची घोडदौड सुरू आहे.आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक काम करण्याची पद्धत, लोकांना मिळणारा सन्मान लक्षात घेवून या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माथेरान येथे पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम घेतला जाईल. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया चौधरी, समित्यांचे सभापती व नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, सोनम दाभेकर, प्रतिभा घावरे, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे , चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMatheranमाथेरानkolhapurकोल्हापूर