गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचे नवे १० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST2021-03-13T04:46:37+5:302021-03-13T04:46:37+5:30
महागाव : गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे दोन दिवसांपूर्वी कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. ११) आणखी ...

गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचे नवे १० रुग्ण
महागाव :
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे दोन दिवसांपूर्वी कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. ११) आणखी ७ रुग्णांची भर पडून हा आकडा १० वर गेल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आज, शनिवार ते सोमवार (दि. १५) अखेर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. एकाच गावात १० रुग्ण सापडल्याने तालुक्यात महागाव हे दुसऱ्या लाटेचा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका आहे.
कोल्हापूर शहरानंतर गडहिंग्लज तालुक्यातील केवळ महागावमध्येच अधिक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सरपंच ज्योत्स्ना पताडे, उपसरपंच निवृत्ती मांडेकर, अमर कडाकणे, प्रशांत शिंदे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, तलाठी युवराज सरनोबत आदी उपस्थित होते.