हातकणंगले शहरामध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:53+5:302021-05-12T04:23:53+5:30

गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूंची संख्याही अधिक आहे. अशातच परिसरांतील आळते, कुभोज, मजले, तारदाळ, कोरोची ...

10 days strict lockdown in Hatkanangle city | हातकणंगले शहरामध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन

हातकणंगले शहरामध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन

गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूंची संख्याही अधिक आहे. अशातच परिसरांतील आळते, कुभोज, मजले, तारदाळ, कोरोची यांसह इतर गावांतही रुग्णसंख्या वाढत असल्याने त्या गावांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी नगराध्यक्ष अरुण जाणवेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी दहा दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा, मेडिकल, दूध डेअरी वृत्तपत्र व लसीकरण ठरलेल्या वेळेत सुरू राहणार असून, विना मास्क फिरणाऱ्यांना दोनशे रुपये तर विनाकारण फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. प्रारंभी मुख्याधिकारी योगेश कदम यांनी स्वागत केले, तर आरोग्य सभापती विजय खोत यांनी आभार मानले. बैठकीला उपनगराध्यक्ष प्राजक्ता उपाध्ये, सर्व नगरसेवक, मधुकर परीट, अतुल मंडपे, सुरेश खोत आदी उपस्थित होते.

Web Title: 10 days strict lockdown in Hatkanangle city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.