शिरोळ तालुक्यात १० कोटी रुपयांचे अनुदान खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST2021-09-02T04:51:52+5:302021-09-02T04:51:52+5:30

* तहसीलदार अपर्णा मोरे यांची माहिती शिरोळ : शासन निर्णयानुसार शिरोळ तालुक्यातील १० हजार १५७ पूरग्रस्त कुटुंबांना १० हजार ...

10 crore in Shirol taluka | शिरोळ तालुक्यात १० कोटी रुपयांचे अनुदान खात्यावर जमा

शिरोळ तालुक्यात १० कोटी रुपयांचे अनुदान खात्यावर जमा

* तहसीलदार अपर्णा मोरे यांची माहिती

शिरोळ : शासन निर्णयानुसार शिरोळ तालुक्यातील १० हजार १५७ पूरग्रस्त कुटुंबांना १० हजार रुपयांप्रमाणे १० कोटी १५ लाख ७० हजार रुपये देण्यात आले आहेत; तर ८ हजार २२ कुटुंबांना पाच हजार रुपयेप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

दहा हजार रुपयाप्रमाणे १० कोटी १५ लाख ७० हजार रुपये सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर पाच हजार रुपयेप्रमाणे ४ कोटी १ लाख १० हजार रुपयाचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित ५ हजार रुपयांप्रमाणे अनुदान प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. शिवाय, मृत जनावरे, घर पडझड, गोठा पडझड, शेती नुकसान आदी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. व्यावसायिक पंचनाम्याच्या याद्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तपासणीचे काम सुरू आहे. घर पडझडीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाकडून अनुदान प्राप्त होताच वाटप करण्यात येणार असल्याचे मोरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: 10 crore in Shirol taluka