१८ वर्षांवरील लसीकरण वाढवण्यासाठी १ हजार ८४६ शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:15+5:302021-09-18T04:27:15+5:30

आरोग्य केंद्रांवर ऑफलाइन पध्दतीनेही लसीकरण केले जात आहे. तसेच प्रत्येक गावात शिबिर घेऊन लस दिली जाणार आहे. यासाठी ...

1 thousand 846 camps for increasing vaccination over 18 years | १८ वर्षांवरील लसीकरण वाढवण्यासाठी १ हजार ८४६ शिबिर

१८ वर्षांवरील लसीकरण वाढवण्यासाठी १ हजार ८४६ शिबिर

आरोग्य केंद्रांवर ऑफलाइन पध्दतीनेही लसीकरण केले जात आहे. तसेच प्रत्येक गावात शिबिर घेऊन लस दिली जाणार आहे. यासाठी महिला व बालविकास, शिक्षण, ग्राम विकास, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय व गृह या विभागांचा सहभाग घेतला जात आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाचे अपेक्षित लाभार्थी १८ लाख ५२ हजार ३६८ असून त्यापैकी ७ लाख २६ हजार ७१९ जणांनी पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ३९ टक्के इतके आहे. तर ४७ हजार ४२८ जणांनी दुसरा डोस घेतला असून हे प्रमाण ७ टक्के आहे़ या वयोगटाचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

---

पात्र लाभार्थी : ३१ लाख २६ हजार ९१७

पहिला डोस घेतलेले नागरिक : २० लाख ५७९ (६४ टक्के)

दुसरा डोस घेतलेले नागरिक : ८ लाख ५४ हजार ३५१ (४३ टक्के)

लस घेतलेले एकूण नागरिक : २८ लाख ५४ हजार ९३०

----

Web Title: 1 thousand 846 camps for increasing vaccination over 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.