१) संकेश्वर-नूलमार्गे बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:24 IST2021-03-16T04:24:10+5:302021-03-16T04:24:10+5:30
नूल : गडहिंग्लज-संकेश्वर व्हाया नूल ही सकाळी साडेअकरा वाजता सुटणारी बस कोरोनामुळे बंद होती. त्यामुळे नूलला कॉलेजसाठी येणाऱ्या पूर्व ...

१) संकेश्वर-नूलमार्गे बससेवा सुरू
नूल : गडहिंग्लज-संकेश्वर व्हाया नूल ही सकाळी साडेअकरा वाजता सुटणारी बस कोरोनामुळे बंद होती. त्यामुळे नूलला कॉलेजसाठी येणाऱ्या पूर्व भागातील खणदाळ-नांगनूरच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्याचवेळी सुटणारी कडलगे बस प्रवासी व विद्यार्थ्यांना अपुरी पडत होती. याची दखल घेऊन गडहिंग्लजचे आगारप्रमुख संजय चव्हाण यांनी संबंधित बससेवा सुरू केल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांत आनंद व्यक्त होत आहे.
नूलमध्ये पदाधिकाऱ्यांचा सत्कार
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील आजी-माजी सैनिक सेवा संस्थेतर्फे नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सेवा संस्था अध्यक्ष सुभाष सावंत अध्यक्षस्थानी होते. यावेळी सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, परशराम जाधव, अनिता काळे, पांडुरंग चव्हाण, भीमाप्पा तराळ, अजित शिंदे, प्रशांत बालेशगोळ, बशीर मुल्ला, जरीना काझी, नफिसा खान, सुरेखा पाटील, अर्चना गोईलकर, सुरेखा शेगुणशी, लता सूर्यवंशी, परशराम सरनाईक यांचा सत्कार झाला.
यावेळी सुरेश पाटील, भगवान सूर्यवंशी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. युवराज गायकवाड यांनी स्वागत केले.