तळगुळीच्या युवकाला 'गडी आम्ही चंदगडी' ग्रुपकडून १ लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:13+5:302021-07-30T04:26:13+5:30
विजय हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूजा, मुलगा विराज (वय ३) व मुलगी रिया ...

तळगुळीच्या युवकाला 'गडी आम्ही चंदगडी' ग्रुपकडून १ लाखाची मदत
विजय हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूजा, मुलगा विराज (वय ३) व मुलगी रिया (वय ५) व त्यांची आई असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाच्या मदतीला म्हणून बेळगाव येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारा त्याचा मित्रपरिवार धावून गेला.
विजय यांच्या पत्नीचे माहेर शहापूर-बेळगाव येथे जाऊन पूजा यांच्याकडे ७५ हजार रुपयांचा धनादेश या मित्रांनी दिला, तर तळगुळी (ता. चंदगड) येथे राहणारी विजय यांची आई रेणुका कांबळे यांनाही २५ हजाराचा धनादेश या मित्रांनी दिला.
याकामी तुकाराम पवार, गजानन सावंत, प्रवीण पाटील, परशराम केसरकर, भरत पाटील, राहुल सावंत, अभिजित कोकितकर, संतोष पाटील, बबन भाटे, गणपत सुखये, विक्रम पाटील, रमेश बसापुरे, अरविंद पाटील, डॉ. संजय आडाव, डॉ. प्रकाश राजगोळकर, प्रकाश पाटील, विनोद साखरे, साईनाथ अष्टेकर, ज्योतिबा पारसे, गुंडूराव कांबळे, संदीप नाईक यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी :
तळगुळी (ता. चंदगड) येथे विजय यांच्या मातोश्री रेणुका यांच्याकडे मदतीचा धनादेश देताना तुकाराम पवार, भरत पाटील, गणपती सुखये, प्रवीण पाटील, गजानन सावंत आदी उपस्थित होते.
क्रमांक : २९०७२०२१-गड-०१