शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ३० हजार नवमतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:16 IST

कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानातून एक लाख ३० हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ३० हजार नवमतदार नवव्या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त कार्यक्रम

कोल्हापूर : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानातून एक लाख ३० हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिली.शाहू स्मारक भवन येथे नवव्या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त जिल्हा निवडणूक विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती ब्रॅड अ‍ॅम्बॅसडर व भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, महापालिका उपायुक्त मंगेश शिंदे, करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे, आदींची होती.यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्ह्याच्या प्रारूप मतदार यादीनुसार २९ लाख ६५ हजार इतके मतदार होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०१९ ला १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नव मतदारांच्या मतदार नोंदणीची मोहीम जिल्ह्यात गतिमान करण्यात आली. यामधून ३१ जानेवारीला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत एक लाख ३० हजार नव्याने मतदारांचा समावेश होईल.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी काटकर म्हणाले, लोकशाही प्रक्रिया बलशाली करण्यासाठी मतदार जागृती महत्त्वाची असून, युवक-युवतींनी या कामी बहुमोल योगदान द्यावे. संयोगिता पाटील म्हणाल्या, १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी मतदानाची नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सक्रीय व्हावे. यापुढील काळात जिल्ह्यातील नवमतदारांशी महाविद्यालयांमध्ये जाऊन आपण संवादाद्वारे मतदार जागृतीचे काम करणार आहे.स्नेहल भोसले म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महिला, युवक, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सेनादलातील मतदार, अनिवासी भारतीय, तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सचिन इथापे यांनी आभार मानले.दरम्यान, मतदान जागृतीसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धांमधील दिव्यांग, तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा, तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाºयांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

‘मतदानासाठी सज्ज’यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदार केंद्रावर नवमतदारांना ‘मतदार असल्याचा अभिमान-मतदानासाठी सज्ज’ हे घोषवाक्य लिहिलेल्या बॅचेस देण्यात आल्या. यावेळी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची चित्रफीत दाखविण्यात आली.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर