१) गडहिंग्लजमध्ये बुधवारी बेघरांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:27+5:302021-03-09T04:25:27+5:30

१) गडहिंग्लजमध्ये बुधवारी बेघरांची बैठक गडहिंग्लज : सर्वसामान्य व गोरगरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी बुधवार (१०) सकाळी ११ ...

1) Homeless meeting on Wednesday in Gadhinglaj | १) गडहिंग्लजमध्ये बुधवारी बेघरांची बैठक

१) गडहिंग्लजमध्ये बुधवारी बेघरांची बैठक

१)

गडहिंग्लजमध्ये बुधवारी बेघरांची बैठक

गडहिंग्लज : सर्वसामान्य व गोरगरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी बुधवार (१०) सकाळी ११ वाजता शिवसेनेतर्फे बेघरांसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणे, तालुकाप्रमुख दिलीप माने, संपर्कप्रमुख सुनील शिंत्रे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी यांनी दिली.

२) ‘शिवराज’मध्ये व्याख्यान

गडहिंग्लज : येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘रोल ऑफ आयुर्वेदा इन कोविड-१९’ याविषयावर प्रा. डॉ. तेजस्विनी कोतमिरे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्रा. अनिल कुराडे होते. प्रणव सावेकर यांनी स्वागत केले.

मसाले पदार्थांचा आहारात वापर करून प्रतिकारक्षमता कशी वाढविता येते, याविषयी कोतमिरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य संतोष कुरबेट्टी, प्रा. विक्रम शिंदे, नयन कर्णेकर, सुमन अडीसरे आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

३) साक्षी मुरगी जिल्ह्यात द्वितीय

गडहिंग्लज : शहरातील गडहिंग्लज हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी अशोक मुरगी हिने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. तिचा मुख्याध्यापक एस. एन. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ए. ए. पोतदार, व्ही. आर. पालेकर आदी उपस्थित होते.

* साक्षी मुरगी : ०८०३२०२१-गड-०५

Web Title: 1) Homeless meeting on Wednesday in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.