शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मास्क-सॅनिटायझर व्यवसायाच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, कोल्हापुरात चौघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:57 IST

ही रक्कम व्यवसायात न गुंतवता ती स्वत:च्या फायद्याकरीता वापरून फिर्यादी पवार यांच्यासह व्यावसायिक साथीदारांची आर्थिक फसवणूक केली.

कोल्हापूर : सॅनिटायझर, हँन्डग्लोज, पीपीई किट, ऑक्झीमीटर, फेस शिल्ड, मास्क या वस्तुंच्या ऑर्डर घेऊन त्या व्यवसायातून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाख १५ हजार ५०० रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चारजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

रोहीत हरिष नागदेव, राहूल हरिष नागदेव, हरिष बलोराम नागदेव (सर्व रा. महालक्ष्मी पार्क सोसायटी, हाॅकी स्टेडियमजवळ), व शाम पल्लोद अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद संतोष मोहन पोवार (वय ४०, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली, दौलतनगर) यांनी दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व त्याचे व्यावसायिक सहकारी जिलानी मुल्ला, समीर भालदार असे तिघांचे शिरोली टोल नाक्याजवळ, कावळा नाका ते तावडे हाॅटेल रस्त्यावर डायमंड मोटर्स हे जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यात संशयितांची फिर्यादीसह व्यावसायिक साथीदारांची ओळख झाली.या व्यवसायासोबत आपण सॅनिटाझर, हॅन्डग्लोज, पीपीई किट, ऑक्झीमीटर, फेसशिल्ड, मास्क या वस्तूंची ऑर्डर घेऊ व त्यातून मोठा नफाही मिळवू असे अमिष दाखवले. 

त्यानूसार फिर्यादीसह त्याच्या साथीदारांनी वेळोवेळी या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यातून आतापर्यंत वेळोवेळी १ कोटी ५ लाख १५ हजार ५०० रूपये इतकी रक्कम फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी संशयितांना दिली.ही रक्कम व्यवसायात न गुंतवता ती स्वत:च्या फायद्याकरीता वापरून फिर्यादी पवार यांच्यासह व्यावसायिक साथीदारांची आर्थिक फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी