उदगांवसाठी १ कोटी ६० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:18+5:302021-06-05T04:18:18+5:30

उदगाव : जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २०२०-२१ वर्षात उदगावसाठी १ कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची ...

1 crore 60 lakhs for Udgaon | उदगांवसाठी १ कोटी ६० लाखांचा निधी

उदगांवसाठी १ कोटी ६० लाखांचा निधी

उदगाव : जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २०२०-२१ वर्षात उदगावसाठी १ कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती जि. प. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी दिली. यातून सर्वसमावेशक कामे होणार असून गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सासणे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेतून ३१ लाख, देसाई, उर्दू व कन्या शाळा बांधकाम व दुरुस्तीसाठी २६ लाख, पंधराव्या वित्त आयोगातून २७ लाख तर जिल्हा नियोजन समितीतून जनसुविधा, नागरी सुविधा व क वर्ग अंतर्गत ४० लाख, जि. प. स्वनिधीतून ५ लाख, रस्ते दुरुस्तीसाठी १५ लाख, २५-१५ योजनेतून जोगेश्वरी मंदिर बांधकामासाठी १० लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी ८ लाख मंजूर झाले आहेत. समाजकल्याण विभागाकडून सामूदायिक व वैयक्तिक योजनेच्या माध्यमातून लाभ पोहोचविण्यात आले आहेत. या निधीतून विविध विकासकामे होणार असल्याचे सासणे यांनी सांगितले.

फोटो - ०४०६२०२१-जेएवाय-०७-स्वाती सासणे

Web Title: 1 crore 60 lakhs for Udgaon