शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गजापूरवासीयांच्या नुकसानभरपाईसाठी १ कोटी ४९ लाख मंजूर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:17 IST

कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणविरोधी आंदोलनावेळी मौजे गजापूरपैकी मुसलमानवाडी येथे झालेल्या हिंसाचारातील बाधित कुटुंबांना नुकसानभरपाईपोटी १ कोटी ४९ लाख ९० ...

कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणविरोधी आंदोलनावेळी मौजे गजापूरपैकी मुसलमानवाडी येथे झालेल्या हिंसाचारातील बाधित कुटुंबांना नुकसानभरपाईपोटी १ कोटी ४९ लाख ९० हजार ९०० रुपये मंजूर झाले आहेत. शुक्रवारी या निर्णयाचा शासन आदेश काढण्यात आला.विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात १४ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान गजापूर येथे समाजकंटकांनी केलेल्या दगडफेक, जाळपोळ व हिंसाचारामुळे घरे, दुकाने, वाहने व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तातडीची मदत म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमधून ५६ बाधित कुटुंबांना प्रापंचिक साहित्य, सानुग्रह अनुदान व दैनंदिन मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये असे १४ लाख व ४२ घरांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयेप्रमाणे १० लाख ५० हजार असे एकूण २४ लाख ५० हजारांचे अनुदान देण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनाने हिंसाचारादिवशी केलेल्या तातडीच्या पंचनाम्यात नुकसानभरपाईची अंदाजित रक्कम अडीच कोटी धरली होती. मात्र, शाहूवाडी तहसीलदार यांच्याकडील सुधारित पंचनाम्यानुसार ही रक्कम १ कोटी ४९ लाख ९० हजार ९०० इतकी होते. ही रक्कम मिळावी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला होता.यावर ३० जुलैला मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानभरपाईच्या रकमेला मंजुरी देण्यात आली. हा खर्च सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, दंगलग्रस्त भागातील झळ पोहोचलेल्या व्यक्तींना साहाय्य, सहायक अनुदाने या लेखाशीर्षाखाली उपलब्ध निधीतून किंवा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा, असे शासन आदेशात नमूद केले आहे.

अटी, शर्ती अशा

  • नुकसानीबाबत नैसर्गिक आपत्तीसाठीचे निकष लावावेत.
  • मदतीसाठी उत्पन्नाची अट नाही
  • बाधित व्यक्तींचा या घटनेत गुन्हेगार म्हणून सहभाग नसावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल नसल्याची पोलिस विभागाकडून खातरजमा करावी.
  • विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली असेल तर मदत मिळणार नाही.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर