शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार
2
बाबर आजमने 'विराट' विक्रम मोडला! पण, अमेरिकेसमोर पाकिस्तानचा संघ ढेपाळला 
3
'खटाखट'मुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर 'फटाफट' रांगा; गॅरंटी कार्ड घेऊन महिला पोहचल्या 
4
अजित पवारांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?
5
बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?
6
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; 'फोन -पे' मुळे छडा, आरोपी जेरबंद
7
PAK vs USA Live : मुंबईच्या सौरभने पाकिस्तानची जीरवली, टेलरच्या अफलातून कॅचने रिझवानची विकेट मिळवली, Video 
8
मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत
9
३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?
10
शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...
11
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
12
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
13
मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी
14
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
15
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
16
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
17
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
18
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
19
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
20
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

VIDEO: हसून माझी आठवण काढा! व्हिडीओ स्टेटस ठेऊन तरुणाची नदीपात्रात उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 8:12 PM

अग्निशमन दलाच्या जवानांकडून मयूर जाधवचा शोध सुरू; अद्याप थांगपत्ता लागला नाही

कल्याण: मोबाईलवरील व्हॉटसअॅपवर व्हिडीओ ठेवून मयूर रामा जाधव या १८ वर्षीय तरूणाने नदीपात्रात उडी घेतल्याची खळबळजनक घटना कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पूलाच्या ठिकाणी सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मयूरचा शोध सुरू केला. परंतु संध्याकाळी उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.मयूर कल्याण पश्चिमेकडील बारावे गावातील आहे. दुपारी त्याने आपली दुचाकी गांधारी पूलाच्या बाजूला लावली आणि नदीत उडी मारली. दरम्यान उडी मारण्यापूर्वी त्याने त्याच्या मोबाईलच्या व्हॉटसअॅप स्टेटसवर व्हिडीओ ठेवला. त्यामध्ये दारू ही माणसाच्या जीवनातील बेकार गोष्ट असल्याचे त्याने सांगितले आहे. काही गोष्टी अशा घडल्या की, मला समोर काहीच रस्ता दिसत नाही. माझी आठवण जेव्हा काढाल तेव्हा हसून आठवण काढा, तुमच्या जीवनात असा जोकर होतो, जो आतून तुटलेला असतानाही तुम्हाला हसवत राहिला असे मयूरने त्यात म्हटले आहे.  मोबाईलवरील व्हॉटसअप स्टेटसवरून ही घटना समोर येताच खडकपाडा आणि पडघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने नदीत उडी मारलेल्या मयूरचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतू तो आढळून आला नाही. रात्री अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आल्याची माहीती आधारवाडी अग्निशमन केंद्राचे उपस्थानक अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली. दरम्यान मयूरने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.