सावळाराम महाराज वनश्री टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन विकसीत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:34 IST2020-12-01T14:33:43+5:302020-12-01T14:34:16+5:30
Botanical garden: आमदार राजू पाटील यांनी केली पाहणी. सकाळ संध्याकाळी अनेकजण फेरफटका मारण्याकरीता, व्यायामासाठी येतात. अनेक पक्षी प्रेमी या टेकडीवर पक्षी निरक्षणासाठी येतात. ही टेकडी प्रदूषणमुक्त आणि मोकळा श्वास घेण्यासाठी एक पर्वणी आहे.

सावळाराम महाराज वनश्री टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन विकसीत करणार
कल्याण-कल्याण ग्रामीण भागातील दावडी, घारीवली, सोनारपाडा, भाल या गावांना लागून असलेल्या संत सावळाराम महाराज वनश्री टेकडीची मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आज पाहणी केली. या टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन विकसीत केले जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.
सकाळ संध्याकाळी फेरफटका मारण्याकरीता, व्यायामासाठी येतात. अनेक पक्षी प्रेमी या टेकडीवर पक्षी निरक्षणासाठी येतात. ही टेकडी प्रदूषणमुक्त आणि मोकळा श्वास घेण्यासाठी एक पर्वणी आहे. व्यायामासाटी येणा:या मंडळींनी या टेकडीवर वनसंपत्ती जीवापाड जपली आहे. त्यामुळे या टेकडीवर वनराई फूलली आहे. काही नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आहे. या टेकडीवरील झाडा झुडपांना पाणी घातले जाते. या टेकडीचे संवर्धन झाले आहे. मात्र काही भूमाफियांनी आणि काही व्यसनी मंडळीनी या टेकडीवर अतिक्रमण केले आहे. काही वेळेस या वनराईला काही अप्रवृत्ती असलेले लोक आग लावून तीन नष्ट करण्याचा प्रयत्न करतात.
मनसे आमदार पाटील यांनी त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यात वनराई विकास करण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार या टेकडीचे संवर्धन करण्याकरीता आमदारांनी पुढाकार घेतला आहे. आज आमदार पाटील यांनी टेकडीची पाहणी केली. यावेळी आमदारांच्या हस्ते तूळशी रोप लावण्यात आले. यावेळी निसर्ग प्रेमींनी त्यांच्याकडे अनेक समस्या मांडला. टेकडीला संरक्षक कुंपण घालण्यात येईल. त्याठिकाणी भगीरथी कुंड आहे. त्याचे पुनरुजीवन करण्यात येईल.
झाडांना पाणी देण्यासाठी ठीपक सिंचन व पंपाचा व्यवस्था केली जाईल. त्यासाठी पाण्याच्या टाक्या बसविल्या जातील. ही टेकडी म्हणजे डोंबिवलीचे आरे आहे. हा हिरवा श्वास टिकवून ठेवण्यासाठी नाशिकच्या धर्तीवर याठिकाणी बॉटनिकल गार्डनही तयार केले जाईल असे आमदार पाटील यांनी सांगितले.