शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत

By मुरलीधर भवार | Updated: September 14, 2022 20:38 IST

डोंबिवली- उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार आहे. त्यासाठीचा जीआर देखील लवकर काढला जाईल असे आश्वास उद्योग मंत्री उदय ...

डोंबिवली- उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार आहे. त्यासाठीचा जीआर देखील लवकर काढला जाईल असे आश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले आहे. सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात सर्टर्डे क्लबच्या वतीने उद्योजकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला उपस्थित असलेले उद्योग मंत्री सामंत यांनी उपरोक्त आश्वासन दिले आहे. प्रसिद्ध यशस्वी उद्योजक हनुमंत गायकवाड यांच्यासह क्लबचे संतोष पाटील, विनीत बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री रोजगार योजने अंतर्गत कर्ज मागणाऱ्या युवा पिढीच्या उद्योजकांची कर्ज प्रकरणे झीरो रिजेक्शन तत्वावर मंजूर करण्यात यावी. त्यांची बँकाकडून हॅरासमेंट करण्यात येऊ नये. त्यांची हॅरासमेंट केल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही सामंत यांनी दिला आहे.

डोंबिवलीतील 156 कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे. त्याविषयी उद्योजक संघटनेशी चर्चा करुन त्यावर बैठक घेतली जाईल. चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर डोंबिवली एमआयडीसीबाबत वारंवार प्रदूषणाच्या घटना घडतात त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळलासोबत या भागाचा येत्या आठ दिवसात दौरा केला जाईल. प्रदूषण होऊ नये यासाठी सूचना केली जाईल. वारंवार सांगूनही परिस्थिती बदलली नाही तर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अडीच वर्षात राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांची यादीच उद्या जाहीर करणार...अडीच वर्षात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची उद्या मी यादीच जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट मंत्री सामंत यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प बाहेर जात असल्याची टीका केली होती. त्या टीकेला सामंत यांनी उत्तरही दिले आहे. येणाऱ्या वर्षभरात महाराष्ट्रातील मराठी उद्योजक दीड लाख रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. त्याला राज्य सरकारही त्याला मदत करणार असल्याची माहिती मंत्री सावंत यांनी दिली आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डील