खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी हरवली; ग्रामस्थ तरुणाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 19:22 IST2022-04-19T19:22:48+5:302022-04-19T19:22:58+5:30
कल्याण ठाकूर्ली रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. त्याठिकाणी ग्रामस्था मृतांवर अंत्यसंस्कार करीत होते.

खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी हरवली; ग्रामस्थ तरुणाची तक्रार
कल्याण-कल्याण-ठाकूर्ली समांतर रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. ही स्मशानभूमी हरविली असल्याची बाब स्थानिक तरुण वैभव राणे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. स्मशानभूमी हरविली असल्यास ती कुठे गेली याचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात यावा अन्यथा या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
कल्याण ठाकूर्ली रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. त्याठिकाणी ग्रामस्था मृतांवर अंत्यसंस्कार करीत होते. आत्ता त्याठिकाणी स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. याठिकाणी पूर्वी पासून स्मशानभूमी होती. लोकवस्ती वाढत गेली. त्यामुळे त्याठिकाणी स्मशानभूमीची गरज असताना स्मशानभूमी गायब कुठे करण्यात आली आहे. त्याला जबाबदार कोण आहे हे विविध प्रश्न राणो यांनी उपस्थित केले आहेत. याठिकाणी अनेक बिल्डरांचे नवे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या गर्तेत नागरीकांची स्मशानभूमीच गायब करण्यात आली आहे.
दरम्यान यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक नगररचनाकार डी. सावंत यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तक्रारदाराची तक्रार आमच्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्याठिकाणच्या जागेच बांधकाम विकासाची परवाग दिली आहे. विकासक एकच असल्याने स्मशानभूमीची जागा बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अधिकारात हा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्मशान भूमी हरविली नसून तिची जागा बदलली आहे.