रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 01:11 AM2021-03-01T01:11:39+5:302021-03-01T01:11:46+5:30

प्रवाशांचा सवाल : उर्मटपणाचा कळस, आरटीओ, वाहतूक पाेलिसांचे दुर्लक्ष

What about the growing number of rickshaw pullers? | रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचे काय?

रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचे काय?

Next

- प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ ही सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा या सीएनजीवर चालतात. मग ही भाडेदरात वाढ का, असा सवाल प्रवासी करत आहेत. शहरात मीटर पद्धतच संपुष्टात आली आहे. ८० टक्के रिक्षा शेअर पद्धतीने धावतात. काेराेना काळात रिक्षात फक्त दाेनच प्रवाशांना परवानगी असताना अनेक रिक्षाचालक चार प्रवासी बसवून दुपटीने भाडेवसुली करत आहेत. कुणी विचारलेच तर मुजाेरी केली जाते. त्यामुळे ही लूट थांबणार की नाही, असा सवाल प्रवासी करता आहेत.


कल्याण आरटीओ परिक्षेत्रात ४० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. यातील निम्या रिक्षा कल्याण-डोंबिवली परिसरात आहेत. शेअर रिक्षांचे प्रस्थ वाढण्यास प्रवासीही कारणीभूत आहेत. त्यामुळे रिक्षातील मीटर शोभेची यंत्र बनली आहेत. अनलॉकमध्ये रिक्षा सुरू करून एक किंवा दोन प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. असे असताना शेअर रिक्षांमध्ये तीन-चार प्रवासी बसवून भाडे दुप्पट वसूल केले जात आहे. पूर्वी १० रुपये आकारले जायचे. आता प्रत्येकी २० रुपये भाडे घेतले जात आहे. यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांत वाद हाेण्याचे प्रकार वाढले आहेत. 


१ मार्चपासून रिक्षाभाडे तीन रुपयांनी वाढवले. रिक्षा संघटनांनी या भाडेवाढीचे स्वागत केले आहे. पण शेअर रिक्षाच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शेअर भाड्यात हाेणारी लूट थांबवावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. रिक्षा सीएनजीवर चालत असल्या तरी सीएनजी दरही आठ रुपयांनी वाढल्याकडे रिक्षा संघटनांकडून लक्ष वेधले जात आहे. एकीकडे मनमानी भाडे आकारले जात असताना दुसरीकडे भाडे नाकारण्याची प्रवृत्तीही कायम आहे. यात प्रवाशांची पुरती फरफट होत असल्याचे चित्र डोंबिवलीच्या पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात सकाळ-संध्याकाळ पाहायला मिळते. आरटीओचे या प्रकारावर कोणतेही नियंत्रण नसल्याने मुजोरी दिवसागणिक वाढत चालली आहे.

पुढाऱ्यांमुळे वाढली चालकांची मुजोरी
ठाणे :  बेकायदा रिक्षाचालकांचे पेव अनेक शहरांमध्ये फुटले असून, स्थानिक नेते, पुढाऱ्यांचा त्यांना आशीर्वाद असल्याने दिवसेंदिवस मुजाेरी वाढली आहे. रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांची नेहमीच पायमल्ली होताना दिसते. त्यांच्या बेदरकार रिक्षा चालविण्यामुळे अनेक प्रवाशांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. 
काही शहरांमध्ये अल्पवयीन मुले बिनबाेभाट रिक्षा चालवत आहेत. त्यामुळे बेदरकारपणा वाढून रिक्षा प्रवास धाेकायदायक बनला आहे. याकडे आरटीओ आणि वाहतूक पाेलिसांकडून हाेत असलेला कानाडाेळाही चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबराेबर त्यांच्या टवाळखाेरीलाही प्रवाशांना सामारे जावे लागत आहे. अनेक रिक्षाचालकांकडे परवाना आणि बॅचही नाहीत. अनेक जण गणवेशही घालत नाहीत. अगदी हाफपॅण्टमध्येही फिरतात. स्टॅण्ड साेडून भाडे भरणे, ताेंडात गुटखा, मद्यपान, गांजाचे व्यसन अशी बेशिस्ती वाढली आहे.

Web Title: What about the growing number of rickshaw pullers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.