शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, त्यांचा आदेश शिरसावंद्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 09:04 IST

कल्याण तालुका, कल्याण ग्रामीण शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांची शनिवारी डोंबिवलीनजीकच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील सागाव येथील शिवसेनेच्या शाखेत विशेष बैठक झाली.

डोंबिवली : एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ डोंबिवली शहरातील मुख्य चौकांमध्ये लागलेले बॅनर बहुतांश ठिकाणी उतरवले गेले लागले असताना डोंबिवलीनजीकच्या कल्याण ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी मात्र मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच असून, साहेब जो आदेश देतील तो आम्हाला शिरसावंद्य आहे, असा ठराव शनिवारच्या पार पडलेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

कल्याण तालुका, कल्याण ग्रामीण शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांची शनिवारी डोंबिवलीनजीकच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील सागाव येथील शिवसेनेच्या शाखेत विशेष बैठक झाली. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक एकनाथ पाटील, कल्याण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, तालुका उपप्रमुख बंडू पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, भगवान पाटील, मुकेश पाटील, सुखदेव पाटील यांच्यासह तालुक्यातील भोपर, सागाव, नांदिवली, सोनारपाडा यासह अन्य भागांतील सेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, गटप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या बैठकीत उपस्थितांकडून एक ठराव संमत करण्यात आला. आम्ही सर्व ठाकरे यांच्यासोबत सोबत आहोत. यापुढे ठाकरे जे आदेश देतील ते आदेश पूर्ण करण्यासाठी काम करू, असा निर्णय यावेळी घेतल्याची माहिती कल्याण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी दिली.

सेना महिला आघाडीही ठाकरेंच्या समर्थनार्थ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. डोंबिवलीचे तमाम शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना त्यांच्याबरोबर आहे. शिवसेना काल ही होती, आज ही आहे आणि उद्याही राहणार,’ अशी प्रतिक्रिया महिला आघाडीतर्फे देण्यात आली. शनिवारी रात्री डोंबिवली शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला आघाडीची बैठक झाली. यावेळी किरण मोंडकर, कविता गावंड, वैशाली दरेकर-राणे, मंगला सुळे, ममता घाडीगावकर यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे