शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘शरद पवारांचे मनसेवर लक्ष असल्याचा आनंद’, बाळा नांदगावकरांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 06:04 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संपलाय, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, असे म्हणणारे मनसेवर टीका करताहेत.

कल्याण :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संपलाय, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, असे म्हणणारे मनसेवर टीका करताहेत. राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मतांवर शरद पवार बोलताहेत. याचा अर्थ राज ठाकरे यांच्यावर पवार यांचे बारकाईने लक्ष आहे, अशी खोचक टीका मनसे नेते बाळा  नांदगावकर यांनी केली.

नांदगावकर म्हणाले की, इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देणे आणि पवार यांनी प्रतिक्रिया देणे यामध्ये फरक आहे. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. ठाण्यातील सभेनंतर तातडीने उत्तर दिले. पवार यांचे राज ठाकरे व मनसेवर बारकाईने लक्ष आहे, याचाच हा पुरावा आहे. पवार यांच्यासारखा नेता आमच्या नेत्याची दखल घेतो, याचा आम्हाला आनंद आहे, असेही  नांदगावकर म्हणाले.

सरकारला अल्टिमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली असल्याकडे नांदगावकर यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की,  बाळासाहेबांच्या तालमीत  राज ठाकरे तयार झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे बरेच गुण राज यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे अल्टिमेटम देणे हा उपजत गुण राज यांच्यात आला आहे.

डोंबिवलीत गुरुवारी सायंकाळी मनसे आमदार राजू पाटील यांच्या पुतणीच्या लग्नासाठी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, नेते बाळा नांदगावकर आले होते. अनेक दिग्गजांनी या लग्नाला हजेरी लावली. 

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसेSharad Pawarशरद पवार