शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरमध्ये वारकरी हेच व्हीआयपी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 18:52 IST

आषाढी एकादशीनिमित्त कल्याणमध्ये विद्यार्थ्यांची भव्य ज्ञान दिंडी

कल्याण : मी नुकताच पंढरपूरला जाऊन आलो. तिथे व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे आता सर्व सामान्य वारकऱ्यांना फक्त पाच तासात दर्शन मिळत असल्याने सर्वजण आनंदात आहेत. मी देखील रांगेत उभा राहून दर्शन घेतले. आमचे सर्व कार्यकर्ते नियमांचे पालन करत आहेत. पंढरपूरच्या मंदिर समितीने आणि महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे की, पंढरपूरमध्ये वारकरी हेच व्हीआयपी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे माध्यमांशी बोलताना केले.

आषाढी एकादशीनिमित्त कल्याणमध्ये आज एक आगळीवेगळी ज्ञान दिंडी काढण्यात आली. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून दिंडीला हिरवा झेंडा दाखवत तिचा शुभारंभ केला. कल्याण चॅरिटी ट्रस्टच्या वतीने बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 'ज्ञान दिंडी'त सहभागी होऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संवाद साधला. बिर्ला स्कूल आणि बिर्ला कॉलेजच्या हजारो विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत, टाळ, मृदुंग, ढोलकीच्या गजरात विठ्ठलनामात तल्लीन होत सहभाग घेतला. ही दिंडी बिर्ला कॉलेजपासून शहाड येथील विठ्ठल मंदिरापर्यंत मार्गक्रमण करत होती. यामध्ये सेंचुरी रेयॉन परिवाराने पुढाकार घेतला. संपूर्ण मार्गावर ‘ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल विठ्ठल’ चा जयघोष घुमत होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेली विठ्ठलभक्तीची झलक उपस्थित प्रत्येकाच्या मनाला भावून गेली.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार कुमार आयलानी, आमदार डॉ. बालाजी किणीकर,  माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह बिर्ला महाविद्यालय आणि कल्याण चॅरिटी ट्रस्टचे पदाधिकारी आणि विद्यार्थी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Eknath Shindeएकनाथ शिंदे