काकाने अल्पवयीन पुतणीवर केला लैंगिक अत्याचार; मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By प्रशांत माने | Updated: October 31, 2023 23:06 IST2023-10-31T22:58:18+5:302023-10-31T23:06:06+5:30

पूर्वेकडील ग्रामीण भागात  पीडित मुलगी आई व सावत्र वडिलांसोबत राहते.

Uncle sexually assaults minor nephew; manpada police arrest accuse | काकाने अल्पवयीन पुतणीवर केला लैंगिक अत्याचार; मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

काकाने अल्पवयीन पुतणीवर केला लैंगिक अत्याचार; मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवली: येथील ग्रामीण भागात काका पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांच्या भावानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत. 

पूर्वेकडील ग्रामीण भागात  पीडित मुलगी आई व सावत्र वडिलांसोबत राहते. तिच्या सावत्र वडिलांच्या भावाची या अल्पवयीन पीडितेवर वाईट नजर होती. गेल्या वर्षभरापासून हा नराधम तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत कोणाला सांगितलं तर तुला सोडणार नाही अशी धमकी या नराधमाने पिडितेला दिली होती. त्रास असह्य झाल्याने पीडीतेने याबाबत आपल्या आईला माहिती दिली. या प्रकरणी पीडीतेने आज मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्यात.

Web Title: Uncle sexually assaults minor nephew; manpada police arrest accuse