मेडीक्वीन सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्या दोन डॉक्टर झळकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 05:18 PM2021-07-17T17:18:20+5:302021-07-17T17:18:29+5:30

13 ते 15 जुलैदरम्यान ही स्पर्धा पुणे येथे पार पडली. पुण्यातील सुप्रसिद्ध डॉ. प्रेरणा बेरी कालेकर मॅनेजिंग डायरेक्टर प्राजक्ता शहा, योगेश पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले हेते. कोरोना काळात रुग्णांच्या सेवेत अहोरात्र वेळ देताना  डॉक्टरांना उसंत मिळाली नाही.

Two doctors from Kalyan appeared in the MediQueen beauty competition | मेडीक्वीन सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्या दोन डॉक्टर झळकल्या

मेडीक्वीन सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्या दोन डॉक्टर झळकल्या

Next

कल्याण- पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या मेडीक्वीन सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्याडॉक्टर सीमा जाधव-शुक्ला आणि रेश्मा बनसोडे यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. सीमा यांना टॅलेंट आणि लावणी नृत्य प्रकारात, तर रेश्मा यांना वेशभूषा प्रकारात बक्षीस देण्यात आले आहे.
 
13 ते 15 जुलैदरम्यान ही स्पर्धा पुणे येथे पार पडली. पुण्यातील सुप्रसिद्ध डॉ. प्रेरणा बेरी कालेकर मॅनेजिंग डायरेक्टर प्राजक्ता शहा, योगेश पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले हेते. कोरोना काळात रुग्णांच्या सेवेत अहोरात्र वेळ देताना  डॉक्टरांना उसंत मिळाली नाही. मेडीक्वीन स्पर्धेचे आयोजन 2020 मध्ये करण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते. 100 हून अधिक स्पर्धाकांचे अर्ज प्राप्त झाले होते. सरकारच्या कोरोना गाईडलाईननुसार 40 स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला. 

हॉटेल आर्चिस येथे ही स्पर्धा पार पडली. वर्धा, कोल्हापूर, ठाणे, कल्याण येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परिक्षक समीर धर्माधिकारी होते. त्यांनी 40 स्पर्धकांमधून ही निवड केली. अनेक डॉक्टरांनी कोरोना काळातील त्यांचे अनुभवही यावेळी सांगिले.
 

Web Title: Two doctors from Kalyan appeared in the MediQueen beauty competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.