शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत २ नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात; उद्धवसेनेकडून नाेटीस; महापौरपदासाठी चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 07:16 IST

भाजप-शिंदेसेनेकडून दावे-प्रतिदावे, नगरसेवकांना फोडण्याच्या राजकीय हालचाली सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: महापौरपदासाठी भाजप आणि शिंदेसेनेकडून ठाकरे बंधूंच्या नगरसेवकांना फोडण्याच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पहिली अडीच वर्षे कोणाचा महापौर यावरून युतीत चर्चा अजून सुरू झालेली नाही. दुसरीकडे दोन नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याने उद्धवसेना धास्तावली आहे. त्यांना पक्षाने नोटीस पाठविली आहे.

उद्धवसेना व मनसेच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठविण्यात आले आहे. शिंदेसेना आणि भाजप युतीचे १०३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना स्पष्ट बहुमत असताना कोणाचा महापौर बसवायचा यावरून युतीचे घोडे अडले आहे. त्यातून दोन्ही पक्षांकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. पहिली अडीच वर्षे कोणाचा महापौर असावा, यावरून भाजप आणि शिंदेसेनेत युतीत निवडणूक लढवूनही एकवाक्यता नाही. पहिली अडीच वर्षे कोणाचा महापौर करायचा, हे सांगून नंतर महापौरपद सोडायचे नाही, असे राजकारण यापूर्वी महापालिकेत घडलेले आहे. त्यामुळे भाजप कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. २०२० मध्ये महापालिकेच्या सदस्य मंडळाची मुदत संपुष्टात येताना उपमहापौरपदाचा दावा भाजपने सोडला नव्हता. त्यावरून भाजपने पाठिंबा काढून घेत विराेधी बाकावर बसणे पसंत केले होते.

महापौरपदासाठी २२ जानेवारीला सोडत

मुंबई : २९ महापालिकांतील महापौर पदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढली जाईल. नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतची सूचना जारी केली. यानंतर महापौरपदासाठी राजकीय घडामोडींना वेग येईल. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षेतेखाली २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदाची आरक्षण सोडत निघेल. ही सोडत निघाल्यानंतर संबंधित आयुक्त महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. सभागृह बैठकीची तारीख निश्चित केली जाईल. पहिल्या बैठकीत महापौर निवड होईल.

नव्याने गठीत केलेल्या जालना आणि इचलकरंजी महापालिका वगळता अन्य महापालिकांत कार्यकाळ संपण्याआधी शेवटचे महापौर पदाचे आरक्षण कधी लागू झाले आणि त्याची मुदत कधी संपली याची माहिती गोळा केली जात आहे. महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाते. त्यामुळे याआधीचे संबंधित महापालिकेचे आरक्षण बाजूला काढले जाईल. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. आरक्षणाच्या प्रमाणाला २९ या संख्येने भागून महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण निश्चित होईल. यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असेल, अशी माहिती नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan-Dombivli: Corporators Contact Shinde Sena; Tussle for Mayor Post.

Web Summary : Political maneuvering intensifies in Kalyan-Dombivli for the mayor's position. Allegations of poaching corporators surface between BJP and Shinde Sena, while Uddhav Sena issues notices amidst the power struggle. The mayoral election is slated for January 22.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा