धर्मवीर आनंद दिघेंना शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्यावतीने आदरांजली

By अनिकेत घमंडी | Updated: January 27, 2024 15:02 IST2024-01-27T15:01:39+5:302024-01-27T15:02:04+5:30

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा देऊन शिवसेना शाखेचा परिसर दुमदुमून सोडला.

Tribute to Dharamveer Anand Dighe on behalf of Shiv Sena Dombivli City Branch | धर्मवीर आनंद दिघेंना शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्यावतीने आदरांजली

धर्मवीर आनंद दिघेंना शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्यावतीने आदरांजली

डोंबिवली: शिवसैनिकांचे श्रद्धास्थान धर्मवीर दिवंगत आनंद दिघेंनच्या ७३ व्या जन्मदिनानिमित्त शिवसेना डोंबिवली शहर शाखेमध्ये शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी *धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो शिवसेना जिंदाबाद,  हिंदुह्रदय सम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो  महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे यांचा विजय असो, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा देऊन शिवसेना शाखेचा परिसर दुमदुमून सोडला.

डोंबिवली शहर प्रमुख  राजेश मोरे,  सहकार्यालय प्रमुख श्री सागर बापट, डोंबिवली पूर्व महिला शहर संघटक स्वातीताई हिरवे, उपशहर संघटक  सुदाम जाधव, उपशहर संघटक महिला आघाडी प्रतिक्षा प्रकाश माने, उपविभाग प्रमुख अरविंद वत्रे, उपकार्यालय प्रमुख  बालन मोरे, विभाग प्रमुख  संदेश पाटील, टिळक नगरचे शाखाप्रमुख मिलिंद केळुसकर, ओम शिवसैनिक ओम वायंगणकर, कार्यालयीन कर्मचारी श्री रोहित जमादार आदी मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धेने उपस्थित होते.

Web Title: Tribute to Dharamveer Anand Dighe on behalf of Shiv Sena Dombivli City Branch