खड्ड्यांची तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा; केडीएमसीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 17:04 IST2021-10-09T17:04:32+5:302021-10-09T17:04:43+5:30
आता पालिका हद्दीतील खड्डयांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी आता टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध केली असून आता नागरिकांना आपल्या परिसरातील खड्डयांची तक्रार या क्रमांकावर नोंदवता येणार आहे.

खड्ड्यांची तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा; केडीएमसीचा निर्णय
कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खड्डयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खड्डयांमुळे सर्व स्तरातुन पालिकेवर कडवट टीका केली जात आहे.अखेर आता पालिका हद्दीतील खड्डयांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी आता टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध केली असून आता नागरिकांना आपल्या परिसरातील खड्डयांची तक्रार या क्रमांकावर नोंदवता येणार आहे.
गेले तीन महिने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत असं प्रशासनानं म्हटलं आहे. पावसाची उघडीप मिळाल्याबरोबर महानगरपालिकेने यापूर्वीच खड्डे भरण्याचे/ रस्ते दुरुस्तीचे कामास प्रारंभ केला आहे असंही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी तक्रार नोंदविण्याकरिता 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी वरील टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्फत करण्यात आले आहे. मात्र आता नागरिकांच्या तक्रारीची दखल कशाप्रकारे घेतली जाते आणि खड्डे बुजवताना कोणती पद्धत वापरली जाते? ते पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.