टिळकनगर बालक मंदिर शाळेच्या भाजी मंडई उपक्रमाला विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद
By अनिकेत घमंडी | Updated: January 11, 2023 14:57 IST2023-01-11T14:56:07+5:302023-01-11T14:57:39+5:30
शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान मिळवणे गरजेचे हा उद्देश.

टिळकनगर बालक मंदिर शाळेच्या भाजी मंडई उपक्रमाला विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद
डोंबिवली: शैक्षणिक ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी डोंबिवली येथील टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित टिळक नगर बालक मंदिरात दरवर्षी भाजी मंडई भरविली जाते. बुधवारी भाजी मंडई हा उपक्रम टिळक नगर बालक मंदिरात संपन्न झाला यावेळी शाळेतील पालकांनी भाजी खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निरनिराळ्या भाज्यांची ओळख होते व भाजी विकत घेताना मुलांना व्यवहार ज्ञान पण मिळते या उद्देशाने शाळेतर्फे दरवर्षी शाळेत भाजी मंडईच्या उपक्रमाचे आयोजन केले जाते. हा उपक्रम बालक मंदिराच्या विभाग प्रमुख स्वाती कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी केला. मंडईच्या उपक्रमास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत भाजी खरेदी करून विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्साह वाढवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"