डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले; अज्ञातावर गुन्हा दाखल

By प्रशांत माने | Updated: March 26, 2023 15:49 IST2023-03-26T15:48:48+5:302023-03-26T15:49:40+5:30

बुधवारी गुढीपाडवा सण साजरा झाला. त्यानिमित्ताने पुर्वेकडील मानपाडा रोडवर ठाकरे गटाकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते.

Three banners of the Thackeray group were torn down in Dombivli; A case has been registered against an unknown person | डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले; अज्ञातावर गुन्हा दाखल

डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले; अज्ञातावर गुन्हा दाखल

डोंबिवली - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुढीपाडव्या निमित्त लावण्यात आलेले तीन शुभेच्छा बॅनर फाडण्यात आले असून याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

बॅनर जाणुनबुजुन फाडल्याचा आरोप पदाधिका-यांनी केला आहे. बुधवारी गुढीपाडवा सण साजरा झाला. त्यानिमित्ताने पुर्वेकडील मानपाडा रोडवर ठाकरे गटाकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. या रोडवरील ढापरे बिल्डींग समोर लावण्यात आलेले तीन बॅनर्स फाडण्यात आल्याचे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास पडले. मध्यरात्रीच्या सुमारास बॅनर्स फाडले गेल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा अशी मागणी शहरप्रमुख खामकरांसह अन्य पदाधिका-यांनी केली आहे.

Web Title: Three banners of the Thackeray group were torn down in Dombivli; A case has been registered against an unknown person