शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना लुटायला ‘ते’ यायचे थेट तामिळनाडूहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 08:27 IST

चौघांना अटक; १२ गुन्हे उघडकीस, कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : रेल्वे प्रवाशांना लुबाडण्याच्या उद्देशाने मुंबईत येणाऱ्या तामिळनाडू राज्यातील वेल्लूर येथील उदयराजा पालियान गावातील चौकडीला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने सापळा रचून अटक केली. ही चौकडी चोरी करण्यासाठी मुंबईला आली होती. सत्यराज ओंथुरगा, कृष्णा गणेश, शक्तिवेल अवालुडन, गणेश सेल्वम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौकडीकडून १२ गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून ११ महागडे मोबाइल, एक लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक अर्षद शेख, पोलिस अधिकारी प्रकाश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला. तपासादरम्यान सत्यराजचे साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सापळा रचला. चोरी करण्यास आलेल्या कृष्णा, अवालुडन आणि गणेश यांना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी