तरुणाने लोकलखाली झोकून देत आत्महत्येचा केला प्रयत्न; अंगावर थरकार उडवणारा Video
By मुरलीधर भवार | Updated: January 2, 2024 20:43 IST2024-01-02T20:38:17+5:302024-01-02T20:43:45+5:30
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील घटना

तरुणाने लोकलखाली झोकून देत आत्महत्येचा केला प्रयत्न; अंगावर थरकार उडवणारा Video
कल्याण- दैव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानकाजवळ आला. आज सकाळच्या सुमारास एका तरुणाने कल्याण रेल्वे स्थानाकातून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खाली स्वतःला झोकुन देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा तरुण रुळामध्ये होता. त्याच्यावरून लोकल गेली. मात्र हा तरुण सुखरूप बचावला.
ही थरारक घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेत कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले . प्राथमिक उपचार करून सोडून दिले .तौसिक सैय्यद असे या तरुणाचे नाव असून तो यवतमाळ येथील रहिवासी आहे. तौफिक मानसिक तणावात असल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याण- दैव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानकाजवळ आला. आज सकाळच्या सुमारास एका तरुणाने कल्याण रेल्वे स्थानाकातून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खाली स्वतःला झोकुन देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा तरुण रुळामध्ये होता. त्याच्यावरून लोकल गेली.… pic.twitter.com/boJkEcQBxG
— Lokmat (@lokmat) January 2, 2024