शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्ली उड्डाणपूलालगतचा 'यू टर्न' ठरतोय धोकादायक वाहनांचा खोळंबा; अपघाताला मिळतेय निमंत्रण

By प्रशांत माने | Updated: April 14, 2023 18:08 IST

वाहनांचा खोळंबा होऊन कोंडीचे चित्र या परिसरात सकाळ-संध्याकाळ पहायला मिळतेय.

डोंबिवलीः पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाणपूलावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाकुर्ली परिसरात केडीएमसीने उड्डाणपूल बांधला. परंतु पुलालगतच्या अरुंद रस्त्यांमुळे येथील वाहतूकीला एकिकडे अडथळे निर्माण होत असताना पूर्वेकडील उड्डाणपूलाला लागून असलेला ' यु टर्न ' अपघात क्षेत्र ठरत आहे. यात वाहनांचा खोळंबा होऊन कोंडीचे चित्र या परिसरात सकाळ-संध्याकाळ पहायला मिळतेय.

कोपर उड्डाण पूलाच्या कामाच्या वेळी ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाढलेली वाहतूक आणि या  परिसरातील अरुंद रस्ते यातील काही मार्ग हे एकदिशा करण्यात आले होते तर काहीठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी पी १ आणि पी २ असे बदल सूचविले होते.  महत्वाचे म्हणजे काही रस्त्यांवर वाहन पार्क करण्यास बंदी घालण्यात आली होती. कानविंदे चौक, व्ही पी रोड, मंजूनाथ चौक, गुरूमंदिर रोड, छेडा रोड, छत्रपती संभाजी महाराज पथ या भागांमध्ये हे बदल सूचविण्यात आले होते. परंतु कोपर उड्डाणपूल सुरु होताच इथल्या वाहतुकीचा कमी झालेला ताण पाहता आजच्या घडीला सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. यात सकाळ-संध्याकाळ कोंडीची समस्या अरुंद रस्ते आणि गल्ली बोळातून येणाऱ्या वाहनांनी उदभवत आहे.

महत्त्वाचे म्हणजे ठाकुर्ली स्थानकापासून उड्डाणपूलाकडे येणारी वाहतूक आणि उड्डाणपूलावरुन त्या दिशेकडे जाणाऱ्या वाहनांमुळे सद्यस्थितीला बिकट अवस्था निर्माण झाली आहे. चिंचोळ्या गल्लीतून उड्डाणपूलाकडे जाणारा हा ' यु टर्न ' अपघातांना देखील कारणीभूत ठरत आहे. यात एकमेकांसमोर येणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊन पूल परिसरात कोंडीची समस्या उदभवत आहे. डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांकडून यावर उपाययोजना करणे आवश्यक होते पण कोंडी आणि अपघातांच्या काहीप्रसंगी घडणाऱ्या छोटया घटना पाहता त्यांना या परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.