शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पादचाऱ्यांना बतावणी करीत लुटणारे दोघे भामटे गजाआड, चोरीचा मुद्देमालही हस्तगत

By प्रशांत माने | Updated: April 17, 2023 18:09 IST

या भामट्यांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. 

डोंबिवलीः दिवसाढवळ्या गजबजलेल्या ठिकाणी संमोहित तसेच बोलण्यात गुंतवून भामट्यांकडून नागरिकांच्या अंगावरील दागिने हातचलाखीने लांबविल्याच्या तीन घटना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडल्या होत्या. दरम्यान या भामट्यांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. 

सोनसाखळी चोरीच्या घटनांनी महिला वर्गात असुरक्षिततेची भावना असताना गजबजलेल्या रहदारीच्या ठिकाणी पुरुष तसेच वृद्ध देखील सुरक्षित नाहीत हे या घडलेल्या घटनांमधून समोर आले होते. साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात होते. डोंबिवली पुर्वेकडील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ आणि ४ एप्रिलला अनुक्रमे  हनुमंत गोसावी  आणि अनिल तांबे यांना बोलण्यात गुंतवून तसेच संमोहित करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने दोघा भामट्यांकडून लांबविण्यात आले होते तर पश्चिमेला राजन खोत या वृद्ध व्यक्तीला लुबाडल्याची घटना ३ एप्रिललाच घडली होती.

याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान एकामागोमाग घडलेल्या गुन्हयांच्या तपासकामी स्थानिक पोलिस ठाण्यात विशेष पथक गठीत केले होते.  दरम्यान रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार सुनिल भणगे, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, रवींद्र कर्पे, विशाल वाघ, पोलिस नाईक हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड यांच्या पथकाला दोघा भामट्यांना सापळा लावून जेरबंद करण्यात करण्यात यश आले. मेहमुद अस्लम शेख (वय ४०) आणि आयुब ताज शेख (वय ५०) दोघेही राहणार मुंब्रा, जिल्हा ठाणे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

त्यांच्या अंगझडतीत रोकड, मोबाईल हॅंडसेट, गॉगल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांकडून रामनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दोन्ही गुन्हयातील १ लाख २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. विष्णुनगर पोलिस ठाण्यात घडलेल्या एका गुन्हयाप्रकरणी त्या दोघांना रामनगर पोलिसांनी  विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिसdombivaliडोंबिवली