शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 09:14 IST

मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडण्यासाठी सोशल मीडियातून माहिती घेतली.

मुंबई - मराठा आरक्षणाविरोधी विधान करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करत मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्ते यांच्या गाडीची काल सकाळी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हेही दाखल झाले होते. मात्र, ५ हजारांच्या जातमुचलक्यावर तिघांनाही अटी व शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर, सुटका झालेल्या मराठा आंदोलकांचा डोंबिवलीत मराठा बांधवांकडून सत्कार करण्यात आला आहे. त्यामध्ये, मंगेश साबळे यांनी पुढाकार घेऊन हे कृत्य केल्याचे आता समोर आले आहे.

मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडण्यासाठी सोशल मीडियातून माहिती घेतली. सोशल मीडियातील विविध बातम्या, युट्यूब व्हडिओ आणि सोशल साईटचा वापर करुन त्यांनी सदावर्तेंचा पत्ता शोधला होता. कारण, आरोपी संभाजीनगर जिल्ह्यातील असून मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पा. गावचे सरपंच आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा वेगवेगळी आंदोलनं गेवराई तालुक्यामध्ये केली आहेत. कधी पैशांची उधळण, तर कधी स्वतःची गाडी जाळण्याचा प्रयत्न अशा आंदोलनांमुळे मंगेश साबळे हे प्रकाशझोतात आले होते. आता, सदावर्ते यांच्या घरी जाऊन त्यांच्या वाहनांची तोडफोड केल्यामुळे पुन्हा एकदा साबळे चर्चेत आले आहेत. 

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिघांचा आता मराठा समाजाकडून सत्कार व सन्मान करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली होती. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं होतं. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, सदावर्ते यांनी गाडीची तोडफोड प्रकरणासंदर्भात माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी जरांगे पाटील हेच दोषी आहेत, त्यांना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. 

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणdombivaliडोंबिवलीGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते