अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देत केला लैगिंक अत्याचार; पाेलिसांनी आराेपीला केली अटक
By मुरलीधर भवार | Updated: March 30, 2023 19:30 IST2023-03-30T19:29:50+5:302023-03-30T19:30:47+5:30
अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देत केला लैगिंक अत्याचार; पाेलिसांनी आराेपीला केली अटक
कल्याण- अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.. या तक्रारीनुसार पोलिसांनी रितेश दुसाने याला अटक केली आहे.
पिडित मुलगा कल्याण पूर्व परिसरात राहतो. काल दुपारच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगा आपला मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेला होता. पिडित मुलाने घरी येण्यासाठी रिक्षा पकडली. तो रिक्षाने घरी आला मात्र घराला टाळा असल्याने त्याला रिक्षाला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो पुन्हा रिक्षा घेऊन त्याच ठिकाणी आला. रिक्षा चालकासोबत या पिडित मुलाचे बोलणे सुरू असताना रितेश हा त्याच्या दुचाकीवर त्याच ठिकाणी उभा होता. रितेशची नजर या मुलावर पडली.
त्याने रिक्षाचालकाला रिक्षाचे पैसे देऊ केले. त्यानंतर पीडित मुलाशी ओळख वाढवली आणि मुलाला घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर बसवून कल्याण पूर्व येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी पीडित मुलाला शीतपेयामध्ये गुंगीचं औषध दिले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रितेश दुसाने याला अटक केली.