क्वारंटाईन सेंटरमधून फरार झालेला कुख्यात आरोपी अखेर दाेन वर्षानंतर झाला जेरबंद
By मुरलीधर भवार | Updated: January 24, 2023 19:21 IST2023-01-24T19:21:43+5:302023-01-24T19:21:53+5:30
अनेक गुन्हे दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत ज्या चैन स्नॅचरवर कारवाई झाली आहे. कोविडचा फायदा घेत जेलमधून पसार झालेल्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी दोन वर्षानंतर अटक केली आहे.

क्वारंटाईन सेंटरमधून फरार झालेला कुख्यात आरोपी अखेर दाेन वर्षानंतर झाला जेरबंद
कल्याण-अनेक गुन्हे दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत ज्या चैन स्नॅचरवर कारवाई झाली आहे. कोविडचा फायदा घेत जेलमधून पसार झालेल्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी दोन वर्षानंतर अटक केली आहे. गाझी दारा इराणी जाफरी असे या आरोपीचे नाव आहे.
कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून इराणी आरोपींच्या विरोधात फास आवळण्यास सुरुवात केली आहे. काही कुख्यात चैन स्नॅचरना पोलिसांनी परत जेरबंद केले. कल्याणचे पोलिस सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सज्रेराव पाटील, पोलिस निरिक्षक शरद जिने यांच्या पथकाने सोमवारी गाझी दारा इराणी जाफरी या सराईत चोरटय़ाला चेरबंद केले. गाजी दारा इराणी जाफरी याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २०२१ मध्ये त्याला अटक केली होती. जेलमध्ये असताना त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले होते. क्वारंटाईन सेंटरमधून तो पसार झाला होता. अखेर दोन वर्षानंतर गाझी जाफरी याला अटक केली आहे. यापूढेही अशा प्रकारची कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.