शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

"प्रकृती ठिक नाही, म्हणून मी राजीनामा देत आहे"; NCP नेते जगन्नाथ शिंदे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

By मुरलीधर भवार | Updated: February 27, 2023 17:00 IST

त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष मंजूर करणार की नाही याकडे आता राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

कल्याण - कल्याण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळू शकत नाही, असे कारण त्यांनी दिले आहे. त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष मंजूर करणार की नाही याकडे आता राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

जगन्नाथ शिंदे यांचे सामाजिक काम मोठ आहे. त्यांच्याकडून टिटवाळ्य़ात एक सैनिकी शाळा चालविली जाते. त्याचबरोबर ते ऑल इंडिया केमिस्ट ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष आहे. त्यांच्या कामाचा व्याप मोठा आहे. राष्ट्रवादीचे ते जूने कार्यकर्ते असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले होते. विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत संपल्यावर कल्याणमधील राष्ट्रवादीला उभारी देण्याकरीता त्यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धूरा २०२० मध्ये देण्यात आली. त्यावेळी त्यांनी पक्षाकडे समन्वयक पद द्या अशी मागणी केली होती. मात्र पक्षाने जिल्हाध्यक्ष पद दिले. जिल्हाध्यक्ष पद उमेश बोरगांवकर यांना द्यावे असे शिंदे यांनी पक्षाला सूचविले होते. मात्र पक्षाने जिल्हाध्यक्ष पदासाठी शिंदे यांचाच विचार केला. जिल्हाध्यक्ष पदाचे काम पाहतान शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले. तसेच कल्याण शिवाजी चौकात पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय सुरु केले.शहरातील बीएसयूपीचे घरे, उल्हास नदी प्रदूषणाचा विषय, रस्ते विकास या विषयी प्रशासनाचे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या विविध चुकीच्या धोरणाच्या विरोधात आंदोलने केली. आत्ता त्यांची प्रकृती ठिक नसल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाचे काम पाहणो शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाने त्यांचा राजीनाम्यावर अद्याप विचार केला नसला तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या पदाधिका:यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीJayant Patilजयंत पाटील