शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमी घराशेजारी आली; आरोग्यावर दुष्परिणाम होतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:20 IST

वायुप्रदूषण आरोग्याला ठरते घातक; धुरामुळे नागरिक त्रस्त

- प्रशांत मानेलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : स्मशानभूमी नागरी वस्तीपासून दूर असावी, असा सर्वसाधारण संकेत आहे; पण वाढत्या शहरीकरणात वेशीबाहेर असलेल्या बहुतांश स्मशानभूमीच्या सभोवताली आता वस्ती वाढून त्या घराशेजारी आल्याचे पाहायला मिळते. 

डोंबिवली शहरात अनेक स्मशानभूमी बांधून वापराविना खितपत पडल्या आहेत; परंतु सद्य:स्थितीला शिवमंदिर रोडवरील मोक्षधाम आणि पाथर्ली स्मशानभूमी अशा दोनच सुरू आहेत. वायू प्रदूषण हे नेहमीच आरोग्यासाठी घातक असते. या दोन्ही स्मशानभूमीत गॅस शवदाहिनीची सुविधा आहे; परंतु काहींचा लाकडावरच अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह असतो. त्यामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे प्रदूषणात भर पडते. ज्यांना अस्थमा, ॲलर्जीसारखे आजार आहेत त्यांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

नागरी वस्त्यांच्या विळख्यात स्मशानभूमीशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी गावखेड्यात स्मशानभूमी या वेशीबाहेरच ठेवली जायची. मात्र, वाढत्या शहरीकरणात जिथे जागा तिथे वस्ती हे चित्र असल्याने इथल्या स्मशानभूमीदेखील नागरी वस्त्यांच्या विळख्यात सापडल्याचे पाहायला मिळतात. 

रामनगर शिवमंदिर रोडवरील मोक्षधाम ही स्मशानभूमी डोंबिवली रेल्वेस्थानकापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. या स्मशानभूमीभोवती सुरुवातीच्या काळात फारशी वस्ती नव्हती; परंतु आता तिथे मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊन वस्ती वाढली आहे. दुसरीकडे पाथर्ली स्मशानभूमीच्या भोवताली, तसेच समोरच्या बाजूस मोठी वसाहत आहे. त्याठिकाणी टॉवरदेखील उभे राहिले आहेत. 

धुराचा त्रास ‘जैसे थे’     डोंबिवली येथील एकमेव सुसज्ज आणि मोठी स्मशानभूमी म्हणून रामनगरमधील शिवमंदिर मोक्षधामची ओळख आहे.     दिवसभरात येथे १५ ते १६ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. याठिकाणी गॅस शवदाहिनी आहे; परंतु काही जण लाकडावर दहन करून अंत्यसंस्कार विधी करतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर धूर आजूबाजूला पसरतो.     यावर उपाय म्हणून केडीएमसीने हा धूर नियंत्रित करण्यासाठी स्मोक न्यूसेंस ॲबेटमेंट सिस्टम बसविली आहे.     त्यामुळे याठिकाणी धुराचा त्रास कमी झाला आहे; पण पाथर्ली स्मशानभूमीत ही सिस्टम नसल्याने त्याठिकाणी दहन करतेवेळी मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडून वस्त्यांच्या ठिकाणी पसरतो.

आरोग्यावर परिणाम होतो का? वायू प्रदूषणाचा त्रास हा अस्थमा आणि ॲलर्जी असलेल्यांना होतो. त्यामुळे ज्याठिकाणी स्मशानभूमीतून दहन करतेवेळी मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असेल तर आजूबाजूच्या वस्तीमधील २ ते ५ टक्के नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याठिकाणी विद्युत, तसेच गॅस शवदाहिनी असेल त्याठिकाणी धुराचा त्रास होत नाही.     - डॉ. समीर जोशी, डोंबिवली 

स्मशानभूमी निर्जन स्थळी हलवावीवाऱ्याची दिशा जशी तसा धूर आजूबाजूला पसरतो. त्याचा सर्वाधिक फटका टॉवरमध्ये राहणाऱ्यांना बसतो. पाथर्ली स्मशानभूमीच्या भोवताली वसाहती, तसेच टॉवर उभे राहिले आहेत. स्मशानभूमीत ज्यावेळी मृतदेह लाकडांवर दहन केला जातो. त्यावेळी धुराबरोबर बराच वेळ परिसरात उग्र दर्प पसरतो. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे संबंधित स्मशानभूमी निर्जनस्थळी हलविण्यात यावी.    - शरद शहाणे, स्थानिक रहिवासी, रेल्वे सोसायटी