शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरं बंद, पण आरोग्यमंदिरं सुरू!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 18:06 IST

आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे : उद्धव ठाकरे

ठळक मुद्देआरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे : उद्धव ठाकरे

राज्यातील मंदीरं खुली करावीत याकरिता भाजपाने नुकतेच ठिकठिकाणी शंखानाद आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती. या मुद्द्यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मंदीरं बंद असली तरी आरोग्य मंदिरं सुरू आहेत आणि ही आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे असे सांगत ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. 

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात  कल्याणडोंबिवलीतील कोपर पुलासह विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ठाकरे यांनी हे विधानं केलं आहे.  पुढे ते म्हणाले की, धार्मिक मंदिरे बंद असली तरी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य मंदिरे मात्र आज सुरू आहेत. त्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देत असून धार्मिक मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील असेही त्यांनी  यावेळी स्पष्ट केले. कोव्हिडंचा काळ अजून संपला नसून माझ्या पक्षांसह सर्व  पक्षांना मी जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे. आपण जबाबदारीने वागलो नाही तर लोकं कसे वागतील? हे सुद्धा त्यांना मी समजावलं असल्याचे  ते म्हणाले. या कार्यक्रमात  टिप्पणी, राजकीय शेरेबाजी, चिमटे आणि शाब्दिक चकमकींमुळे ही  विकासकामांपेक्षा आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे याची अधिक प्रचिती आली. 

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असणाऱ्या विकास कामांबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे तर केंद्र सरकारचा कोवीड इनोव्हेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे यावेळी विशेष शब्दांत कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर,  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, केडीएमसी आयुक्त शहर अभियंता सपना कोळी, सचिव संजय जाधव यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित होते. 

"...तर घोषणा देऊन काय उपयोग"एकीकडे जर आपल्या देशातील नागरिक औषधपाणी, ऑक्सिजन आदी आरोग्याच्या सुविधांपासून वंचित असतील तर नुसत्या 'भारत माता की जय' घोषणा देऊन काय उपयोग? ती भारतमाता आपल्याला काय बोलेल अशा शब्दांत  ठाकरे यांनी नाव भाजपला टोला लगावला. इतकंच नाही तर  घोषणांच्या पलीकडे जाऊन  आम्ही हिंदुत्वाची काळजी घेतो असेही ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.

आपल्या भाषणात डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी डीपीआर मंजूर होऊनही अद्याप काम सुरू न झालेल्या 428 कोटींच्या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले की बॅकलॉगबाबत बोलायचे झाले तर 400 कोटी, साडेचारशे कोटींसह अगोदर साडेसहा हजार कोटींबाबत माहिती घ्यावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली