शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून 'मंदिर प्रवेश'; अध्यात्मिक व धार्मिक भावना चिरडण्याचा सरकारवर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 12:49 IST

BJP : अध्यात्मिक व धार्मिक भावना चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न  असल्याचा आरोप भाजपा आध्यात्मिक आघाडीकडून करण्यात आला.

कल्याण : मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी भाजपाच्यावतीने शंखानाद आंदोलन सुरू असताना सोमवारी कल्याण पूर्वत देखील जरी मरी तिसाई मंदिराबाहेर भाजपा आध्यात्मिक आघाडीतर्फे शंख, टाळ, मृदंग वाजवत मंदिर उघडण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. यावेळी अध्यात्मिक व धार्मिक भावना चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न  असल्याचा आरोप भाजपा आध्यात्मिक आघाडीकडून करण्यात आला. तसेच अध्यात्मिक आघाडीच्या कार्यकर्त्यांसह वारकऱ्यांनी थेट मंदिरात प्रवेश केला.  

महाराष्ट्र वगळता देशातील अन्य राज्यांतील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू  आणि मंदिर-धार्मिक स्थळे बंद असे काळे चित्र उभ केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मंदिराचे दार उघडत  शंखनाद व टाळ मृदंगाच्या गजरात देवीची आणि  प्रभू श्रीरामचंद्रांची  आरती केली. 

वारकरी संप्रदाय आणि धार्मीक संस्थामुळेच कोरोना पसरतो हे बिंबवून समाजाला  दडपण्याचा हा हीन   प्रयत्न सरकारकडून  केला जातोय.हजारोंच्या गर्दीत  मंत्री लग्नाला हजेरी लावतात तेव्हा कोरोना पसरत नाही का?  असा आरोपयावेळी ह. भ. प. चंद्रभान सांगळे  महाराज यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्यासह अनेक भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा